卐 ॐ गं गणपतये नमः 卐
नाना परिमळ दूर्वा शेंदुर शमिपत्रे ।
लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रें ॥
ऐसें पूजन केल्या बेएजाक्षर मंत्र ।
अष्तहि सिद्धि नवनिधि देसी क्षणमात्रे || १ ||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।।
तूझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ।। धृ ।।
तुझें ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलहि पापें विघ्नेंही हरति ।।
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावुनि अंतीं भवसागर तरती ।। जय देव || २ ||
शरणागत सर्वस्वें भजती तव चरणीं ।
कीर्ति तयांची राहे जोंवरि शशि-तरणी ।।
त्रैलोक्यीं ते विजयी अद्भुत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणीं ।। जय देव | ३ ||
卐 गणपती बाप्पा मोरया 卐