Homeमराठी भजनबाई माझ्या गं दुधात नाही पाणी: संत एकनाथ महाराज रचित लोकप्रिय गवळण

बाई माझ्या गं दुधात नाही पाणी: संत एकनाथ महाराज रचित लोकप्रिय गवळण

गोकुळच्या गवळणी दही, दूध, ताक आणि लोणी विकण्यासाठी बाजारात निघाल्या आहेत. आपल्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये पाणी नसल्याचा आणि ते शुद्ध असल्याचा विश्वास त्या व्यक्त करतात. रानातील चारा खाणाऱ्या पशुधनामुळे हे दूध दर्जेदार असल्याचे यात नमूद केले आहे.

यमुनेच्या अवघड घाटावरील प्रवास आणि महानंदाची भक्ती याचे वर्णन या काव्यात येते. संत एकनाथांच्या रचनेनुसार, ईश्वराच्या चरणी लीन होण्याचे महत्त्व यात सांगितले आहे. हे काव्य गवळणींचा प्रामाणिकपणा आणि त्यांच्या मनातील आध्यात्मिक भाव अधोरेखित करते.

बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || धृ ||

गोकुळच्या त्या गाई म्हशीचं
खाणं सगळं राण माळाचं
उगीच कशाला चाखून बघायचं
पैशा विणा घेणं
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || १ ||

यमुनेचा तो अवघड घाट
चढता चढता दुःखतिया पाट
नेहमीच तयाची वारी कट
थांबू नका गवळणी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || २ ||

महानंदाची वेडी माया
देवासाठी तिची सुखली काया
एका जनार्दनी पडू त्याच्या पाया
देवा लीन होवूनी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || ३ ||

बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular