Sundar te Dhyan in Marathi | सुंदर ते ध्यान

Sundar te Dhyan Sant Tukaram Abhang in Marathi
Sundar te Dhyan in Marathi | सुंदर ते ध्यान
सुंदर ते ध्यान, उभे विठेवरी
कर कटावरी ठेवोनिया

तुळसी हार गळा, कांसे पितांबर
आवडे निरंतर तेची रुप

मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजीत

तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने

भावार्थ:

विठ्ठलाचे सुंदर रूप कमरेवर हात ठेवून विटेवर उभे आहे. त्याच्या गळ्यात तुळशीचे हार असून कमरेभोवती पीतांबर आहे. विठ्ठलाचे हे रूपच मला नेहमी आवडते. त्याच्या कानांत मत्स्याच्या आकाराची कुंडले चमकत आहेत आणि गळ्यात कौस्तुभरत्‍न शोभत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाचे हे मोहक मुखकमल हेच माझे सर्व सुख आहे. ते मी नेहमी आवडीने पाहीन.

You may also like...

2 Responses

  1. sundar te tyan hube vithevari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *