Eknath Sashti – Jala Samadhi Din

Eknath Sashti

Eknath Sashti

This is the day on which sant eknath left his body in river Godavari and took Jala samadhi at Paithan. Every year in falgun (marathi month) 5 to 6 lacks devotees gather together. Around 600 “Dindi” (mob of warkaries) enjoying three days of this festival. This festival is second largest festival in Maharashatra next to Aashadhi Ekadashi Pandharpur. It takes place around March–April. The 2016 date is March 29.

श्रीएकनाथष्ठी हा दिवस महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर श्रीएकनाथमहाराज जलसमाधी दिन ( Jala Samadhi Din ) म्हणुन साजरा करण्यात येतो. विशेषत: पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविक ह्या सोहळ्यास उपस्थित असतात.पैठण येथील नाथषष्ठीची वारी वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी असून पंढरपुरच्या आषाढी वारी नंतर ह्या वारीस मोठया प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो. विविध ठिकाणांहून आलेल्या ४७५ दिंडया, “भानुदास-एकनाथ” चा गजर हयामुळे संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो.

फाल्गून वद्य षष्ठी, सप्तमी व अष्टमी (साधारणत: मार्च महिना) ह्या दिवसांत हा उत्सव साजरा करण्यात येतो. द्वितीयेस गावातील नाथमंदिरातील रांजणाच्या पूजेनं उत्सवाची सुरूवात होते. द्वितीया ते पंचमीपर्यन्त श्रीकेशवस्वामीकृत नाथ चरित्राचे पारायण करण्यात येते. पंचमीच्या दिवशी मानकऱ्यांना उत्सवाचे आमंत्रण दिले जाते.

उत्सवाचा इतिहास – फा.व.६ ह्या दिवशी पाच घटना घडल्याने त्यांना पंचपर्वश्रेणी असं म्हणतात. नाथ स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून यादिवशी उत्सव साजरा करीत. पुढे नाथांनीही ह्याच दिवशी जलसमाधी घेतल्याने श्रीएकनाथषष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येवू लागला.

पंचपर्व –
१) नाथांचे गुरू श्री जनार्दनस्वामी यांचा जन्म
२) स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन व अनुग्रह
३) नाथांना स्वामींचे प्रथमदर्शन व अनुग्रह
४) श्री जनार्दनस्वामी पुण्यतिथी
५) श्रीएकनाथमहाराज जलसमाधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *