आम्ही जातो आपुल्या गावा – मराठी गीत
आम्ही जातो आपुल्या गावा ।
आमचा राम राम घ्यावा ।।
तुमची आमची हे चि भेटी ।
येथुनियां जन्मतुटी ।।
आतां असों द्यावी दया ।
तुमच्या लागतसें पायां ।।
येतां निजधामीं कोणी ।
विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ।।
रामकृष्ण मुखी बोला ।
तुका जातो वैकुंठाला ।।
संत तुकाराम
[Also Read: Vrukshavalli Amha Soyari | वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ]