राधा राधा करी बासरी
राधा राधा करी बासरी |
कृष्ण येता झाली बावरी ||
भेट तुझी रे युगा युगा ची |
साथ दे तू मज जन्माची ||
मिलना ची आशा अंतरी |
कृष्ण येता झाली बावरी ||
घाघर घेउनी पानियाशी जाता |
अड़ रस्त्या वरी कान्हा उभा होता ||
किती करशिल रे मस्करी |
कृष्ण येता झाली बावरी ||
एका जनर्धानी पूर्ण कृपेने |
सद्गुरू श्री मी शरण मी आले ||
किती करशिल रे मस्करी |
कृष्ण येता झाली बावरी ||