शनिवार, मार्च 7, 2026
Homeमराठी भजनमनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला

मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला

मनमोहन मुरलीवाला ।
नंदाचा अलबेला ॥१॥

भक्तासाठीं तो जगजेठी ।
कुब्जेसी रत जाला ॥२॥
मनमोहन मुरलीवाला

विदुरा घरच्या भक्षुनि कण्या ।
परमानंदें धाला ॥३॥
मनमोहन मुरलीवाला

भक्तिसुखें सुखावला ।
एका जनार्दनीं निमाला ॥४॥
मनमोहन मुरलीवाला

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular