श्री खंडोबाची आरती
पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा ।
खंडामंडित दंडित दानव अवलीळा ।।
मणिमल्लां मर्दुनियां जो धूसुर पिवळा ।
हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ।। १।।
जय देव जय देव जय शिव मल्हारी ।
वारी दुर्जन असुरां भवदुस्तर तारी ।। धृ ।।
सुरवर संवर वर दे मजलागी देवा ।
नाना नामे गाईन ही तुमची सेवा ।।
अघटित गुण गावया वाटतसे हेवा ।
फणिवर शिणला किती नर पामर केवा ।। जय || २||
रघुवीरस्मरणी शंकर हृदयीं निवाला ।
तो हा मल्लंतक अवतार झाला ।।
यालागी आवडे भाव वर्णिला ।
रामी रामदासा जिवलग भेडला || जय || ३ ||