शनिवार, मार्च 7, 2026
Homeआरती संग्रहश्री विठ्ठल आरती - ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा

श्री विठ्ठल आरती – ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा

ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा ।
राईरखुमाबाई सत्यभामेच्या वरा ।। धृ ।।

कनकाचे पर्येळी उजळोनी आरती ।
रत्नदीपशोभा कैशा प्रकाशल्या ज्योती ।। ओवाळूं || १ ||

मंडित चतुर्भुज कानीं शोभत कुंडले ।
श्रीमुखाची शोभा पाहतां तेज फांकले ।। ओवाळूं । २॥

वैजयंती माळ गळा शोभे स्यमंत ।
शङ्खचक्रगदापद्म आयुधें शोभत ।। ओवाळूं ।। ३ ॥

सांवळा सुंदर जैसा कर्दळीचा गाभा ।
चरणीईंचीं नूपुरें वांक्या गाजती नभा ।। ओवाळूं ।। ४ ।।

ओवाळीता मन माझें ठाकलें ठायी ।
समाधिस्थसमान तुकया लागला पायी ।। ओवाळूं ||५||

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular