मंगळवार, एप्रिल 16, 2024
HomeसणVat Pournima Katha Vidhi in Marathi

Vat Pournima Katha Vidhi in Marathi

Vat Pournima Katha Vidhi in Marathi

वटपौर्णिमा – (Vat Pournima) जेष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.

Vat Pournima Katha

सावित्री ही भद्र देशाचा राजा अश्वपती ह्याची कन्या. आपल्या सत्वगुणी समंजस, गुणवान, रूपवान, धैर्यवान आणि सुशील कन्येबद्दल राजा-राणीला मोठा आभिमान होता.

खरं तर अशा ह्या सुंदर राजकन्येला कुणीही एखादा राजकुमार सहज पती म्हणून मिळाला असता पण तसं घडलं नाही तिनं निवड केली ती जंगलात राहणाऱ्या सदाचारणी, सत्यवचनी, सामर्थवान आणि आपले नांव सार्थ करणाऱ्या सत्यवानाची.

सत्यवान हा अल्पायुषी होता. लग्नानंतर तो एक वर्षातच मृत्यू पावेल हे भाकित ठाऊक असून ही सावित्रीनं त्याच्याशीच विवाह केला.

सावित्री सत्यवानाच्या झोपडीत आनंदात राहू लागली. सासू सासऱ्याची सेवा करू लागली. पतीसेवा करू लागली. पतीला त्याच्या कामांत मदत करू लागली.

होता होता एक वर्षाचा काळ होत आला.. आणि तो दिवस उगवला. पहाटे पासूनच सावित्रीला अपशकुन होऊ लागले. तिनं एक वेगळाच निश्चय केला. त्या दिवशी ती मुद्दाम पती बरोबर जंगलांत लाकडं तोडण्यासाठी गेली.

झाडावर चढून सत्यवान लाकडं तोडून खाली टकत होता आणि सावित्री ती लाकडं गोळा करत होती.. आणि एका-एकी घेरी येऊन सत्यवान झाडावरून खाली पडला. सावित्रीनं त्याला एका वृक्षाखाली नेलं व त्या वृक्षाच्या सावलीत ती त्याला सावध करण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात तिथं यमराजाची स्वारी आली आणि सत्यवानाचे प्राण हरण करून घेऊन जाऊ लागली.

तशी सावित्री ही यमराजांचे मागे धावत जाऊ लागली. आपल्या पतीचे प्राण परत मागू लागली. बाळ! मृत्यूच्या मार्गावरचा प्रत्येक जीव हा एकटा असतो. त्याचा कुणी सोबती नसतो. तू परत जा.. यमराज म्हणाले.

तेव्हा पतीवाचून पत्नीने जगावे का? तिच्या जगण्याला काही अर्थ राहतो का? सहगमन हा पत्नीचा धर्म आहे असं शास्त्रच सांगते नां? अशी अनेक प्रश्नोत्तरे करून सावित्रीने अखेर यमराजाचे मन जिंकले.

तिचा निश्चय, धैर्य, धर्म शास्त्राच ज्ञान, तिच बुद्धी कौशल्य, चतुराई हे सारं पाहून यमराज प्रसन्न होऊन म्हणाले,”सावित्री, एक लक्षांत ठेव. केवळ पतीचे प्राण सोडून हवे ते माग, मी ते देईन. बोल काय हवे तुला”.

मग सावित्रीने चतुराईन यमाकडे सासऱ्याचं गेलेल राज्य मागितले. यम हो म्हणाले, सासू-सासऱ्यांना दृष्टी मागितली, यमराजाने ती दिली. असं एक-एक मागता-मागता सावित्रीने पुत्र मागितला. यमराज इतर मागण्यांप्रमाणे हो म्हणाले आणि..

दिल्या शब्दाप्रमाणे पुत्रप्राप्तीसाठी यमराजांना सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले.

वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व (Vat Pournima Puja Importance)

वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्‍वराची पूजा करणे. कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्‍ती व शिव यांच्या संयुक्‍त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला फायदा होतो.

वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे महत्त्व ( Vat Puja)

वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्‍त लहरी शिवतत्त्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात. ज्या वेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते, त्या वेळी जिवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात.

वडाच्या पूजनामध्ये पाच फळे का अर्पण करावीत
फळे ही मधुररसाची, म्हणजेच आपतत्त्वाची दर्शक असल्याने फळांच्या समुच्चयाकडे आकृष्ट व प्रक्षेपित होणाऱ्या देवतांच्या लहरी कमी कालावधीत जिवाच्या देहातील कोषांपर्यंत झिरपू शकतात.

प्रार्थना  ( Vat Prarthana)
सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाचे पूजन करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’, अशी प्रार्थना करतात.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular