Saturday, March 7, 2026
HomeAarti SangrahYuge Atthavis - Pandurangachi Aarti in Marathi

Yuge Atthavis – Pandurangachi Aarti in Marathi

श्री पांडुरंगाची आरती

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥
निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥

आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥
पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ १ ॥

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥

पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ २ ॥

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥

विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥
विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ ३ ॥

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular