जय देव जय देव श्रीमंगेशा ।
पंचारति ओवाळू सदया सर्वेशा ।। धृ ।।
सदया सगुणा शंभो अजिनांबरधारी ।
गौरीरमणा आद्या मदनांतकारी ।।
त्रिपुरारी अधहारी शिवमस्तकधारी ।
विश्वंभर विरुदे हैं नम संकट धारीं || जय || १ ||
भयकृत भयनाशन ही नामें तुज देवा ।
विबुधादिक कमळासन वांछिती तव सेवा ।।
तुझे गुण वर्णाया वाटतसे हेवा ।
अभिनव कृपाकटाक्षे मतिउत्सव द्यावा ।। जय ।। २॥
शिव शिव जपता शिव तू करिसी निजदासा ।
संकट वारी मम तूं करी शत्रुविनाशा ।।
कुळवृद्धीते पाववी हीच असे आशा ।
अनंतसुत वांछितसे चरणांबुजलेशा ।। जय ।। ३ ।।