सांग राधे कुणा संग हसली गं – Krishna Bhajan
सांग सांग सांग राधे सांग ना ग
सांग राधे कुणा संग हसली गं
तुझ्या वेणिची गाठ कशी सुटली ग
घागर घेउन पानियाशी जाता
पानियाशी जाता बाई ग यमुनेशी जाता
पानियाशी गं यमुनेशी गं
अग हसली….
सांग राधे कुणा संग हसली गं
तुझ्या वेणिची गाठ कशी सुटली ग
दही दूध घेउन बाजाराला जाता
बाजाराला जाता बाई ग मथुरेला जाता
बाजाराला गं मथुरेला गं
अग हसली…
सांग राधे कुणा संग हसली गं
तुझ्या वेणिची गाठ कशी सुटली ग
एका जनार्धनी राधा गौळण
गौळण गेली कृष्णा ला शरण
नव्या युगाची नवरी नटली ग
तुझ्या वेणिची गाठ कशी सुटली ग
Also Read – राधा राधा करी बासरी