Friday, March 29, 2024
HomeBhajansUth Pandharichya Raja - ऊठ पंढरीच्या राजा

Uth Pandharichya Raja – ऊठ पंढरीच्या राजा

Uth Pandharichya Raja

ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला
थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला

पूर्व दिशी उमटे भानू
घुमे वारियाचा वेणु
सूर सूर वेणुचा त्या सुगंधात न्हाला

कुक्षी घेऊनिया कुंभा
उभी ठाकी चंद्रभागा
मुख प्रक्षाळावे देवा, गोविंदा गोपाला

पुंडलीक हाका देई
उभ्या राही, रखुमाबाई
निरांजने घेऊन हाती सिद्ध आरतीला

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – प्रसाद सावकार
चित्रपट – संत गोरा कुंभार
राग – देसकार , भूप
गीत प्रकार – चित्रगीत , विठ्ठल विठ्ठल

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular